सकाळी ज्याचे केले अंत्यसंस्कार संध्याकाळी आला घरी…? बडोद्या मधील घटना

बडोदा, १३ डिसेंबर २०२०: जर एखादं कुटुंब सकाळी आपल्या नातलगाचे अंत्यसंस्कार करून घरी परततात आणि संध्याकाळी तोच नातलग पुन्हा घरी आला तर? होय, अशीच एक आश्चर्यकारक घटना मध्य प्रदेशातील श्योपुर मधून समोर आली आहे. जिथं एका कुटुंबानं आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले परंतु ती व्यक्ती जिवंत परत आली. ते पाहून पोलिस व कुटुंबियांची तारांबळ उडाली. जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं तेव्हा प्रत्येकजण थक्क झाला.

बडोद्याच्या माताजी मोहल्लाची ही घटना आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता शहरातील पुल गेट स्मशानभूमीजवळ पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जेणेकरून त्याची ओळख पटेल. शुक्रवारी सकाळी व्हायरल चित्र पाहून बडोद्याच्या बंटी शर्मा यानं मृताला आपला भाऊ दिलीप शुक्ला ४-५ दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं. बंटी शर्मा म्हणाले की, दिलीप मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे.

यानंतर बंटी शर्मा यांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी पंचनामासह कागदपत्रही पूर्ण केली. दिलीप शुक्ला यांचा मृतदेह घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. परंतु, रात्री आठ वाजता दिलीप घरी परतले, हे पाहून शेजारचेच नव्हे तर कुटुंबीय देखील थक्क झाले.

अंत्यसंस्कारानंतर आपल्या भावाला जिवंत पाहून घरातंल शोकाकुल वातावरण अचानक आनंदामध्ये बदललं. परंतु, अज्ञात व्यक्तीची ओळख पटवून आणि अंत्यसंस्कार करून पोलिसांच्या कारवाईच्या भीतीनं कुटुंबातील सर्व सदस्य आता कॅमेर्‍यासमोर येण्यास घाबरत आहेत. दिलीपच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, फोटो आणि चेहऱ्याच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आमच्याकडून चूक झाली आहे. तर दुसरीकडं पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी योग्य प्रकारे कारवाई केली होती. याबरोबरच आता पोलीस या अज्ञात व्यक्तीच्या फोटोवरुन ती व्यक्ती कोण आहे याचा शोध घेत आहेत.

सध्या या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ओळखण्यासाठी त्याचे कुटुंबीय रवाना झाले आहेत. असं सांगितलं जात आहे की, ज्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला तो भेला भीम लत गावचा रामकुमार आदिवासी होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याचं कुटुंब शहर कोतवाली येथे पोहोचंल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अज्ञात व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता या व्यक्तीच्या अस्थी देण्यात येईल. त्याचवेळी या विचित्र घटनेची चर्चा दूरदूरपर्यंत सुरू आहे की अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात इतकी मोठी चूक कशी झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा