G-20 शिखर परिषदेस चीनचा नकार का ?

2023 ची आगामी शिखर परिषद होण्याआघीच वादात अडकली आहे. या परिषदेचा मान पुढच्या वर्षीसाठी भारताला मिळाला आहे. यासाठी ही परिषद पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मिर येथे होणार असल्याचं 2022 मधल्या इंडोनेशिया मधल्या परिषदेत जाहीर केलं होतं.

पण यावर आता चीन आणि पाकिस्तानने हरकत घेतली आहे. पाकिस्तानची हरकत एकवेळ समजू शकतो, मात्र चीनला जम्मू काश्मिर बद्दल आक्षेप का ? हे मात्र कारण समजू शकले नाही.

जम्मु काश्मिरच्या संदर्भात मोदींनी घेतलेला निर्णय हा ग्लोबल पातळीवरचा निर्णय असून त्यामुळे जम्मू काश्मिरला स्वत:ची ओळख निर्माण होणार आहे. तसेच त्यामुळे आतंकवादाला एका दृष्टीने आळा बसणार आहे. पण चीनने मात्र या स्थळावर आक्षेप घेतला आहे. यामागे चीनची रणनीती नक्की काय आहे, हे समजत नाही. पाकिस्तान हा कायम काश्मिरसाठी आग्रही असल्याने त्याचा नकार हा समजण्यासारखा आहे. पण चीनच्या नकारामागे नक्की काय षड्यंत्र आहे, हे मात्र ओळखणं गरजेच आहे. कारण मुळातच पाकिस्तान सध्या चीनच्या बाजूने बोलत आहे. त्यामुळे यामागे नक्की काय शिजतंय हे पहाणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा