‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, कशामुळे चढला अजितदादांचा पारा..!

बारामती, २६ जुलै २०२१: अजित पवारांचं रोखठोक बोलणं हे नेहमीच चर्चेत राहणारं आहे. दादांचं हे रॉक बोलणं बारामतीलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मग समोरच्याला त्याचा राग आला तरी चालेल. असा दादांचा स्वभाव… हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे रविवारी बारामतीत अजित पवारांच्या जनता दरबारात घडलेला प्रसंग. एका नागरिकांना अजित पवारांना निवेदन दिलं. त्या निवेदनाशील मागणी बघून अजित पवार पटकन बोलून गेले.

नेहमीप्रमाणे अजित पवार शनिवारी पुण्याच्या आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामं घेऊन अजितदादांकडे येत असतात. काल सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजितदादांचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजितदादांकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजितदादांना दिलं.

काय होतं निवेदनात…

‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की, यामध्ये लक्ष घालून मला मदत करावी’, असं या व्यक्तीने निवेदनात म्हटलेलं होतं. निवेदनातील ही मागणी वाचून अजित पवार चांगलेच संतापले. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’ असं म्हणत अजित पवार यांनी त्या व्यक्तीची आपल्या नेहमीच्या शैलीत कानउघाडणी केली. तसेच ते म्हणाले की, ‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असा सज्जड दम अजितदादांनी यावेळी दिला. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका’.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा