शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं ? अजित दादा म्हणाले.. त्यांना मी आदर दिला.

24

२३ जानेवारी २०२५ पुणे, बारामती: पुण्यामधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अजित पवार सुद्धा उपस्थित होते, ज्यावेळी अजित पवार व्यासपीठावर आले, त्यावेळी आसनव्यवस्था शरद पवारांच्या बाजूला करण्यात आली होती. अजित पवारांनी आसनव्यवस्था पाहिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवारांच्या बाजूला सहकार मंत्री “बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितली. यातूनच राजकारणात अस चित्र समोर येतं की अजित पवार यांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचे दिसून आले. त्यांच्या या कृतीबद्दल चर्चेचं वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांनी या कृतीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मागच्या काही दिवसापासून काका आणि पुतणे महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमाला एकच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. परंतु, एकमेकांशी बोलणे आणि बसणे ते टाळत आहेत.आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपल्याला हेच पाहायला दिसलं त्यामुळे राजकारणात काका- पुतणे पुन्हा जनतेच्या डोळसमोर आले आहेत.
अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त दिली ते म्हणाले, “ सहकार मंत्री बाबासाहे पाटील यांना शरद पवारांशी बोलायचे होतं. मी शरद पवारांशी कधीही बोलू शकतो, त्यामुळे मी आसनव्यवस्था बदलून त्यांना मधे बसवलं. बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यामुळे त्यांना मी आदर दिला.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा