दिल्ली २७ जानेवारी २०२५ : भारत आणि पाकिस्तान या उभय संघात होणारा प्रत्येक सामना रोमांचक असतो तसेच दोघांच्या सामन्याची चाहते सुद्धा आतुरतेने वाट पाहत असतात. याचवेळी जलवा समोर येतो तो टीम इंडियाच्या स्टार फलंदाज विराट कोहलीचा त्याने जरी आजवरच्या झालेल्या सामन्यात शानदार कामगिरी केली असली तरी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो नेहमी वेगळ्याच उत्साहात असतो. 2022 मध्ये खेळवल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान सोबतचा हरायला आलेला सामना त्याने भारतीय संघाला जिंकून दिला होता. विराट कोहली पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी का करतो असे विचारणायत आले असता, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रैना म्हणला की, कोहलीची मानसिकता खूपच वेगळी आहे. याशिवाय त्याचा स्विच चालूच राहणार आहे. त्याची मानसिकता वेगळी असून जेव्हा गंभीर परिस्थिती असेल तेव्हा तो मैदानात खेळण्यासाठी तयार असेल. त्याच्यासाठी तो जोमाने सरावही करतोय. कोहली हा पहिला माणूस असेल जो येईल आणि म्हणेल चल लढू, मला त्याच्यासोबत खेळताना क्षेत्ररक्षणचा खूप आनंद मिळतो.
माजी क्रिकेटर पुढे म्हणला की, “उत्तर भारतातील परिस्थिति थोडी वेगळी आहे. आम्ही तिथून आलो आहोत त्यामूळे आम्ही पराभव सहन करू शकत नाही.आम्हाला कसे हरवायचे माहीत नाही.आम्ही मरेपर्यंत हार मानणार नाही. हीच आमची वृत्ती आहे”
बीसीसीआयच्या नियमवालीनुसार संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले होते, त्यानुसार अनुभवी खेळाडुंनी देशांतर्गत सामन्यात खेळायला सुरुवात देखील केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 10 वर्षानंतर देशांतर्गत सामना खेळासाठी मैदानात उतरला आहे. आता इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सुद्धा 2024-25 च्या रणजी ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. कोहली दिल्ली कडून खेळणार असून दिल्लीचा संघ येत्या 30 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचा सामना रेल्वेविरुद्ध खेळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर