आमचीच कोरोना टेस्ट का? इतर विक्रेत्यांचीही करा; भाजी विक्रेत्यांची अस्वस्थता

8

वाघोली, दि. २९ ऑगस्ट २०२०: वाघोलीतील भाजीपाला विक्रेत्यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने भाजीपाला विक्रेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. भाजीपाला विक्रेत्यांचीच टेस्ट का? किराणा, चिकन, मटण, मासे, मेडिकल, चहा विक्रेते, व इतर दुकानात देखील गर्दी होऊन सोशल डिस्टंसिंग पाळली जात नाही त्याची सुद्धा कोरोना टेस्ट व्हावी, अशी मागणी भाजी विक्रेते व काही ग्रामस्थांनी केली आहे.

वाघोली सर्कलच्या असिस्टंट एनसिडेंट कमांडो रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत बैठकीत वाघोलीतील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजीविक्रेते विक्री करताना सोशल डिस्टंसिंग पाळत नाही. सुरक्षेची काळजी घेत नसल्याचा मुद्दा आला होता. यानुसार वाघोलीतील भाजीपाला विक्रेते यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट करण्याचे ठरले व टेस्ट केलेल्या विक्रेत्यांना भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच भाजी विक्रेत्यांना सायंकाळी पाचपर्यंत विक्रीची अनुमती देण्यात यावी असा निर्णय झाला.

भाजी विक्रेत्यांची कोरोना टेस्ट करण्याच्या निर्णयाचे स्वागत अनेक ग्रामस्थांनी केले असले तरी, टेस्टला काही विक्रेते व ग्रामस्थांनी देखील आक्षेप घेतला आहे.

भाजीपाला विक्रेत्यांसह किराणा, चिकन, मटण, मासे, डेरी, मेडिकल, चहा, विक्रेते व इतर दुकानात देखील सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसल्याचे भाजी विक्रेते आणि काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यांची सुद्धा कोरोना टेस्ट व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा