नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू? शरद पवारांचा पटोले यांना टोला

6

पुणे, १२ जुलै २०२१: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानासाठी गेल्या काही काळापासून चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे महा विकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होतं. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार हे त्यांचे विधान राजकीय वर्तुळात खूप चर्चेत राहीलं होतं. त्यानंतर पटोले यांनी पुन्हा असं विधान केलं ज्यात ते म्हणाले की, महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे. याआधी कोणत्याही नेत्याचं प्रत्यक्ष नाव घेऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये कधीच टीका करण्यात आली नव्हती. पण यावेळी शरद पवार यांनी नाना पटोले यांचं नाव घेत फटकारलं आहे.

शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. नाना पटोले यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना अनुलेखाने टाळण्याचा प्रयत्न केल्यानं उलटसुलट चर्चांना वेग आलाय.

महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पटोले यांना थेट त्यांची जागाच दाखवली. या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळं चर्चांना उधाण आलं आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच शरद पवार यांनी थेट पटोलेंवर टीका करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पटोलेंच्या विधानाला आपण किंमत देत नसल्याचंही पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते पटोले ?

पटोले लोणावळ्यात होते. एका मेळाव्याला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण, तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळं कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा