कंडोमचा वापर कश्यासाठी

भारतात कंडोम याविषयी बोलताना आजही बऱ्याच वेळेस विचार केला जातो. कुटुंब नियोजनासाठी कंडोम चा वापर करावा म्हणून प्रशासन नेहमीच अग्रेसर असते. जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक जाहिराती चालवल्या जातात. अजूनही हा विषय बोलताना अजूनही समाज तितका प्रगल्भ दिसत नाही. पण या कंडोम विषयी एक धक्कादायक माहिती समोर आले आहे याचा वापर हा कुटुंब नियोजनासाठी न करता आजची तरुण पिढी ही व्यसनासाठी करत आहे…….

पश्चिम बंगालमधील तरुण या दिवसांमध्ये वेगळ्याच व्यसनाच्या आहारी जात आहे. आणि ती नशा म्हणजे कंडोम नशा, तरुण हे कंडोमचा वापर अमली पदार्थ म्हणून करत आहेत. कंडोम ला गरम पाण्यात भिजवून ठेवले जाते, ज्यामुळे कार्बनिक अनु अल्कोहोल योगिक पद्धतीने विभागले जाते, ज्या पासून नशा केली जाते….

जगातील सर्वांत जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे, कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहेत. हा युवावर्ग विवेकी, निरोगी, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त आणि सुदृढ असणे, हीच देशाची खरी ताकद आणि यश असते.पण जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार व्यसनांच्या आहारी जाऊन मृत्यू ओढवलेल्यांची संख्या दरवर्षी १५ लाख इतकी आहे. यात १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा