आम्हाला बोनस का नाही, पिंपरी चिंचवड मधील सफाई कामगार महिलांचा ठेकेदाराला सवाल…!

चिंचवड: दि. ३१ ऑक्टोबर २०२० महानगरपालिकेच्या वतीने कायम कर्मचारी यांना ८.३३ टक्के बोनस सह १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे, याबाबत ची घोषणा महापौर आणि पदाधिकारी यांनी जाहीर केली आहे.

याबाबत माहिती मिळताच आणि ठेकेदारांनी दिवाळी देण्यास नकार दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम करणाऱ्या महिलांनी कामावरून सुट्टी होताच पिंपरी येथील कष्टकरी कामगार पंचायत कार्यालयात धाव घेतली व पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांची भेट घेऊन आणि बैठक घेऊन महापालिकेच्या दुजाभाव आणि भेदभाव केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

कायम कामगारांची दिवाळी गोड होत असतानाच गोर-गरीब कष्टकरी महिलांची दिवाळी मात्र अंधकारमय होणार आहे कायम व कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या कामगारांना बोनस देणे कायद्याने बंधन कारक आहे, या कायद्याची सर्वत्र अंमलबजावणी होत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र कायदा पायदळी तुडवला जात आहे, याबाबत साफ सफाई कामगार महिला संगीता जानराव म्हणाल्या कायम कामगारांना बोनस जाहीर झाला त्यांचे स्वागत आहे.

परंतु आमच्या सोबत सावत्रपणाची वागणूक का महानगरपालिका प्रत्येक महिन्यात बिला सोबत ठेकेदारांना बोनसची रक्कम देते ठेकेदार आम्हाला बोनस देत नसतील तर यावर अंतिम निर्णय प्रशासन घेऊ शकत नाही, मधुरा डांगे म्हणाल्या आम्ही गलिच्छ अशा ठिकाणी हाताने घाण स्वच्छ करून, शहर स्वच्छ करतो, आमच्याही घरात दिवाळीचा दिवा उजळला पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही व कांता कांबळे, म्हणाल्या आम्ही आमच्या हक्काचे बोनस मागत आहोत ते न मिळाल्यास आम्हाला कायदेशीर मार्गाने मिळवावा लागेल व कामगार आयुक्त कडे याबाबत आम्ही तक्रार करणार आहेत असे बोलताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा