पत्नीचा मालमत्तेवर हक्क; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

6

मुंबई १ फेब्रुवारी २०२५ भारतीय कायद्यानुसार महिलांना त्यांच्या मालमत्तेवर संपूर्ण अधिकार आहेत. जर कोणी त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्या न्यायालयात जाऊ शकतात. अशाच एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला मालमत्तेचा संपूर्ण वापर करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

उत्तर-पश्चिम दिल्लीतील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या 85 वर्षीय लाजवंती देवी यांनी आपल्या मुलगी आणि जावयाविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी 1985 मध्ये त्यांना स्वतःच्या घरात राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यांनी घर रिकामे करण्यास नकार दिला. न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर महिलेलाच घराची कायदेशीर मालकीण मानले.

न्यायालयाचा ठराव

पतीने 1966 मध्ये मालमत्ता पत्नीच्या नावावर खरेदी केली होती, त्यामुळे मुलगी व जावयाला त्यावर हक्क सांगता येणार नाही.

मुलगी आणि जावयाने 6 महिन्यांच्या आत घर रिकामे करावे, असा आदेश दिला आहे.

2014 पासून चालू असलेल्या खटल्यामुळे त्यांना महिलेला दरमहा ₹10,000 भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जोपर्यंत घर सोडले जात नाही, तोपर्यंत दरमहा ₹10,000 दंड आकारण्यात येणार आहे.

या निकालामुळे महिलांच्या मालमत्तेवरील हक्कांना न्याय मिळाला असून, महिलांना कायदेशीररित्या त्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा अधिकार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा