झोपडपट्टीतील वीजजोडसाठी आंदोलन करणार – भगवानराव वैराट

इंदापूर, ८ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील निमगांव येथील गट नं.११०, स.नं.१३ मधील झोपडपट्टी वासियांच्या लाईटच्या प्रश्नासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बारामती अधिक्षक अभियंता पावडे यांना भेटण्यास गेले असता, अधिक्षक अभियंता यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

इंदापुर तालुक्यातील निरनिम येथे गेली ३० ते ४० वर्षांपासुन झोपडपट्टीत लोक राहत आहेत. या वस्तीमध्ये अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरीक मोठ्या संख्येने राहत आहेत. याबाबतीत फेब्रुवारी महिन्यात कार्यकारी अभियंता इंदापूर यांच्याकडे वस्तीत वीज जोडण्याचा प्रस्ताव देऊन कार्यकारी अभियंता इंदापूर यांनी घरगुती वीज जोडणी केली नाही.

महाराष्ट्र शासनाचा ८ ऑक्टोबर १६ च्या नियमाप्रमाणे कनेक्शन देताना ग्राहकाकडून २०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरती वीज जोडणी देणे गरजेचे असताना गेली ८ महिन्यांपासून कोणतीही कारवाई न झाल्याने झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक अभियंता पावडे यांची भेट घेतली, त्यानंतर अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्र्वासन दिले गेले.

यावेळी राज्यसंघटक तानाजी पाथरकर, जिल्हाध्यक्ष बापू शेंडगे, जिल्हा संघटक आबासाहेब शिंदे, पुणे शहराध्यक्ष महम्मद शेख, महिला अध्यक्षा सुरेखा भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष माधव गायकवाड, किर्तीताई गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा