आडी मठाच्या हॉस्पिटलसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर, ५ डिसेंबर २०२२ : आडी येथील श्रीदत्त देवस्थानच्या वतीने वंदूर येथे उभारण्यात येणाऱ्या शंभर बेडच्या सुसज्ज हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू. या हॉस्पिटलमुळे सीमा भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले.

आडी येथील श्रीदत्त देवस्थान परिसरात सामुदायिक जप सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकप्रतिनिधी, उद्योगपती व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांत सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.

श्रीदत्त देवस्थान मठाचे अधिपती राजीवजी महाराज यांच्या संकल्पनेतून वंदूर येथे हॉस्पिटलची उभारणी सुरू केली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. यामुळे कागल, निपाणी, चिकोडी, करवीर तालुक्यांना आणि सीमा भागातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

माझ्या मतदारसंघात हॉस्पिटल होत असल्याचा मला आनंद होत आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हणाले. कार्यक्रमास कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले, माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार चन्नराज हट्टीहोळी, युवराज पाटील, भय्या माने आदी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा