राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार ; या धमकीमुळे राज्यात खळबळ

अहमदनगर, १२ एप्रिल २०२३: संपूर्ण देशभरात उपोषण आणि आंदोलनामुळे प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करणार अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे. इतक्या उघडपणे दिलेल्या या धमकीने राज्यात एकच खळबळ माजली आहे. शेतीच्या वादातून खोट्या केसेस दाखल झाल्यानं कुटुंब दहशतीखाली जगत आहे.

समाजसेवक अण्णा हजारेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री यांना अनेकवेळा निवेदन दिल्यानंतरही काहीच होत नसल्याने संतोष गायधने या व्यक्तीने हजारे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. संतोष यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी देखील मागितली होती. त्यातूनच १ मे रोजी अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीत जाऊन हत्या करणार असा इशारा संतोष गायधने यांने दिला आहे.

अण्णा हजारेंना दिलेल्या हत्येच्या धमकीने प्रशासनात जोरदार खळबळ माजली आहे. आता अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अण्णा हजारे समर्थकांनी प्रशासनाला केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा