हार्टबर्न की हृदयविकार ? जाणून घ्या सत्य !

12

पुणे ८ फेब्रुवारी २०२५ : छातीत होणारी जळजळ अनेकदा हृदयविकाराचा झटका असल्याचे संकेत देते, परंतु यामागे ऍसिडिटी आणि हार्टबर्न हे देखील कारण असू शकते.

हार्टबर्न म्हणजे काय ?

हार्टबर्न ही पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे. जेव्हा पोटातील ऍसिड अन्ननलिकेत येते, तेव्हा छातीत जळजळ आणि वेदना होतात. याला ऍसिड रिफ्लक्स असेही म्हणतात. पचनसंस्थेतील स्फिंक्टर नावाचा स्नायू ऍसिड पोटात ठेवतो. पण, जेव्हा हा स्नायू नीट काम करत नाही, तेव्हा ऍसिड अन्ननलिकेत येते आणि जळजळ होते.

हार्टबर्नची लक्षणे काय आहेत ?

छातीत जळजळ, अन्न गिळताना त्रास होणे, घशात आणि छातीत दुखणे, ढेकर येणे, मळमळ आणि उलटी येणे ही हार्टबर्नची प्रमुख लक्षणे आहेत.

हार्टबर्न टाळण्यासाठी काय करावे ?

  • तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
  • जेवणानंतर लगेच झोपू नका.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
  • ताणतणाव कमी करा.
  • नियमित व्यायाम करा.

हार्टबर्न झाल्यास काय करावे ?

हार्टबर्न झाल्यास थंड दूध प्यावे, ओवा आणि बडीशेपचे पाणी प्यावे.

डॉक्टर नारायण कुलकर्णी यांच्या मते, छातीत जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे, जळजळ वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.हार्टबर्न आणि ऍसिडिटी ही पचनसंस्थेशी संबंधित समस्या असली, तरी ती गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा