मविआ सरकार कोसळणार का…. ?

मुंबई २१ जून, २०२२: भाजपने राज्यसभाच नाही तर विधानपरिषदेत घवघवीत यश मिळवले आहे. या पार्शवभूमीवर आता मविआत नाराजी आणि बिघाडी पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत १७ आमदार नॅाट रिचेबल आहेत. तर भाजपला बहुमताची गरज असून जर एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला तर मात्र मविआ कोसळणार, हे नक्की.

संजय राठोड, शंभूराजे भोसले, तानाजी सावथ, विश्वनाथ भोईर, प्रकाश आबिटकर, महेंद्र दळवी, शांताराम मोरे, भरत देहावसान, महेंद्र थोरवे, ज्ञानराज चौगुले , अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांसारखे अनेक आमदार नॅाट रिचेबल आहेत. अब्दुल सत्तार हे पण नॅाट रिचेबल आहेत.

एकनाथ शिंदे दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. जर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर मविआ सरकार कोसळणार हे नक्की होईल. मविआत हे खिंडार कसे पडले आणि नक्की नाराजी कशामुळे या प्रश्नांची उत्तरे दुपारी दोन वाजता मिळतील.
एकनाथ शिंदे सध्या गुजरातच्या मेरिडीयन हॅाटेलमध्ये असून तेथे कडक बंदोबस्त आहे.

पण रणनीती १४ जून पासून सुरु होती असे समजते. पंतप्रधान मोदी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र एका हेलिकॅाप्टरने पुण्याला आले खरी खलबत तिथून सुरु होती. सध्या सेनेचे २६ आमदार भाजपच्या संपर्कात आहे. पारडे पलटणार का ? फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का ? हे आता काळ वेळ नाही तर भाजप ठरवेल, अशी चिन्ह दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा