Mumbai MI vs KKR Match Overview: तब्बल पाच वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघला यंदाच्या आयपीएलच्या हंगामात विजय मिळवता आलेला नाही. मुंबईला सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स कडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर दुसरीकडे गुजरात टायटन्सकडून त्याना पराभव पत्करावा लागला होता. आता मुंबई इंडियन्स आज घरच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. मुंबई गतविजेत्या कोलकाताशी भिडणार आहे. याप्रसंगी मुंबई संघाचे लक्ष हंगामातील पराभावाची हॅट्रिक टाळण्याकडे असणार आहे. दुसरीकडे कोलकताचा संघ दूसरा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.
यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून कोणत्याच खेळडूने चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. सलामीवीर जोडीला पहिल्या दोन सामन्यात चांगले रन करण्यासाठी सुर गवसता आलेले नाहीत. याशिवाय मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माला मागच्या दोन सामन्यात शानदार कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला खाते सुद्धा उघडता आले नव्हते. गुजरातसोबतच्या सामन्यात देखील तो ८ धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवने मागच्या सामन्यात ४८ धावांची खेळी केली, पण त्याने केलेल्या फलंदाजीत सहजता दिसून आली नाही.
वानखेडेवर हार्दिक पंड्यावर चाहत्यांचे लक्ष
मागील हंगामात मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाकडून रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेऊन हार्दिक पंड्याकडे देण्यात आले. यावेळी मुंबई इंडियन्सच्या चाहत्याना हा निर्णय आवडला नव्हता. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर हार्दिकला ट्रॉल करण्यात आल होत.यंदाच्या हंगामात सलग दोन सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे.अशा परिस्थितीत घरच्या मैदानावर मुंबई आणि कोलकता यांच्यात लढत होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर