नवी दिल्ली, 29 एप्रिल 2022: इलॉन मस्क आणि ट्विटरच्या डीलनंतर सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढून टाकलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या तरी तसं झालेलं नाही. इलॉन मस्क यांच्या प्रवेशाचा आणि पराग अग्रवाल यांच्या बाहेर पडण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे ‘फ्री स्पीच’.
वास्तविक, फ्री स्पीचवर दोघांमध्ये फरक असू शकतो. कारण पराग अग्रवाल ट्विटरला फ्री स्पीच व्यासपीठ मानतात, तर एलोन मस्क कंपनीच्या धोरणाला आणि सेन्सॉरशिपला विरोध करत आहेत.
काय म्हणाले पराग अग्रवाल?
मात्र, या दोघांपैकी कोणीही सध्या सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांचा विरोध केलेला नाही. पराग अग्रवाल यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘ट्विटर सुधारण्यासाठी मी हे काम स्वीकारलं आहे, जिथं ते दुरुस्त करणं आणि सेवा मजबूत करणं आवश्यक आहे. आमच्या लोकांचा अभिमान आहे ज्यांनी एवढा गोंधळ असूनही लक्ष आणि तत्परतेने काम सुरू ठेवलंय.
nope! we’re still here
— Parag Agrawal (@paraga) April 27, 2022
ए पॅरोडी अकाउंट Not Parag Agrawal यांनी पराग यांच्या ट्विटला उत्तर दिलं, ‘मला वाटलं की आम्हाला काढून टाकण्यात आलं आहे.’ यावर ट्विटरचे सीईओ म्हणाले, ‘नाही! आम्ही अजून इथेच आहोत.’ पराग अग्रवाल यांचं ट्विटरवरून जाणं तितकं सोपं नाही जे लोक अंदाज लावत आहेत. कंपनीने त्यांची हकालपट्टी केल्यास अग्रवाल यांना भरीव रक्कम दिली जाणार नाही.
ट्विटरने काढले तर मिळतील इतके पैसे?
रिपोर्ट्सनुसार, कंपनीला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवल्यानंतर त्यांना 42 मिलियन डॉलर द्यावे लागतील. या करारानंतर 12 महिन्यांत त्यांना कंपनीतून काढून टाकल्यास त्यांना $42 दशलक्ष मिळतील. 2021 मध्ये, ट्विटरच्या सीईओला $ 3.04 दशलक्षची भरपाई मिळायची, जी बहुतेक स्टॉक अवॉर्डच्या रूपात होती.
ट्विटर, मस्क आणि डील
या महिन्याच्या सुरुवातीला, इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9.2% हिस्सा विकत घेतला. यानंतर कंपनीने त्यांना बोर्डात रुजू होण्याची ऑफर दिली. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर देताना बोर्डात सामील होण्यास नकार दिला.
त्यांनी ट्विटरला $44 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती, जी कंपनीने नंतर स्वीकारली. हा करार पूर्ण होण्यासाठी काही महिने लागतील, त्यानंतर इलॉन मस्क ट्विटरचे मालक होतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे