झिम्बाब्वे, २७ ऑक्टोंबर २०२२: झिम्बाब्वेला मिस्टर बीनच्या रूपात एका पाकिस्तानी व्यक्तीला पाठवल्याबद्दल एका ट्विटर युजरला T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा बदला घ्यायचा आहे. २०२२ च्या T20 विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानच्या कट्टर-प्रतिस्पर्धी भारताकडून त्यांच्या झालेल्या नाट्यमय पराभवाने कदाचित ते हादरले असतील परंतु गुरुवारी पर्थ येथे जेव्हा ते झिम्बाब्वेला भेटतील तेव्हा एक वेगळंच आव्हान त्यांची वाट पाहत आहे. निश्चितच, भारत-पाकिस्तान सामन्याइतके या स्पर्धेचे साक्षीदार नसतील, परंतु ट्विटरवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वेच्या चाहत्यांमध्ये आधीच स्पर्धा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे बनावट मिस्टर बीन.
याला सुरुवात झाली जेव्हा पाकिस्तान क्रिकेटच्या ट्विटर अकाउंट वर झिम्बाब्वेच्या मॅच आधी कठोर परिश्रम करत असलेल्या खेळाडूंचा फोटो शेअर केला. त्याच वेळी एका झिम्बाब्वे ट्विटर यूजरने PCB च्या ट्विट वर उत्तर देताना म्हटले की त्यांनी झिम्बाब्वेला “बनावट” मिस्टर बीन पाठवल्याबद्दल ते पाकिस्तानला विसरले नाहीत किंवा क्षमाही केलं नाहीए.
“झिम्बाब्विअन म्हणून आम्ही तुम्हाला माफ करणार नाही… तुम्ही एकदा आम्हाला मिस्टर बीन रोवन ऐवजी बनावट पाक बीन दिला होता.. आम्ही या प्रकरणाचा उद्या निकाल लावू , प्रार्थना करा की पाऊस तुम्हाला वाचवेल..”
न्गुगी चासुराने च्या म्हणण्यानुसार त्यांनी कृषी शो नावाच्या स्थानिक कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमात मिस्टर बीनऐवजी पाकिस्तानचा बनावट बीन पाठवला होता. असिफ मोहम्मद हा पाकिस्तानी नागरिक असून तो मिस्टर बीन म्हणजेच रोवन ऍटकिन्सनसारखाच दिसतो. असिफ मोहम्मद, ज्याला मिस्टर पाक बीन म्हणून ओळखले जाते, त्याला २०१६ मध्ये झिम्बाब्वे येथे काही कार्यक्रमांसाठी बोलावण्यात आले होते जिथे तो लोकांचे मनोरंजन करणार होता.
न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर