पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन आज शाहबाज शरीफ पायउतार होणार? सार्वत्रिक निवडणुक जाहीर होण्याची शक्यता

पाकिस्तान, ९ ऑगस्ट २०२३ : शाहबाज शरीफ आज पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. शाहबाज शरीफ त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळवण्यासाठी पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली वेळेपुर्वी विसर्जित करण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तान संसद कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक आयोगाने ६० दिवसांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र हा कालावधी अपूरा आहे. नुकतेच देशात नवीन जगणनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता १२० दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू करु शकते. त्यामुळे पाकिस्तानमधील निवडणूका काही महिने लांबणीवर पडतील, अशी शक्यता गृहमंत्री राणा सनउल्लह यांनी सांगितले आहे.

शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काही नावांची चर्चा सुरू आहे. घटनात्मक दृष्ट्या, काळजीवाहू सहमत होईपर्यंत शाहबाज शरीफ हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा