सुरेश रैना चेन्नई संघात परतणार? वाचा काय म्हणाले सीएसके संघाचे सीईओ

दुबई : २६ सप्टेंबर,२०२० इंडियन प्रीमियर लीग च्या १३ व्या हंगामात आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट मानला जाणारा संघ सी एस के सध्या हवं तसं प्रदर्शन करताना दिसत नाहीये. सी.एस.के. संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. आणि पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराजित करत टुर्नामेंट मध्ये विजयी सलामी दिली. परंतु त्यानंतर झालेल्या २ सामन्यात सी.एस.के संघाला पराजयाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यात फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले आहे. दिल्ली कॅपिटल विरुद्ध झालेल्या सामन्यात पराजय झाल्यामुळे ,क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडिया वर सी.एस.के संघाचा प्रसिद्ध आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सुरेश रैना याने संघात परत येण्याचा मुद्दा उचलून धरला आहे.

परंतु सीएसके संघाचे सीईओ यांनी स्पष्ट केले आहे की, या सीजन मध्ये सुरेश रैना याचे खेळणे कठीण आहे. आयपीएल चा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुरेश रैना कोरोना व्हायरस च्या भीतीपोटी संघात नाही आहे. सीएसके संघाचे सीईओ म्हणाले की, “रैना ने या सीजन साठी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि आम्ही रैना च्या निर्णयाच स्वागत करतो. आम्ही रैना ला पुन्हा आणण्याचा विचार नाही करत.” सीईओ ने सी.एस.के. संघ पुन्हा जोरदार मुसंडी मारेल अशी आशा व्यक्त केली आहे.

पुढे ते म्हणाले ,” आमच्या संघाला क्रिकेट रसिक चांगलीच पसंती देतात.आणि आम्ही त्यांना विश्वास देतो की सी.एस.के. संघ याच सीजन मध्ये जोरदार वापसी करेल. आम्ही चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य आणू.” तसेच अंबाती रायुडू २ ऑक्टोबर पासून उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. रायुडू सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा