पावसात दडलेल्या खड्यांची दुरुस्ती होणार का ?
बारामती , १७ ऑक्टोबर २०२० : बारामती शहरातील गल्लीतील ,अंतर्गत ,रिंग रोडच्या रस्त्यांची दयनीय दुरावस्था झाली आहे.सुरू असलेल्या पावसाळ्यात अनेक लोकांना याचा प्रत्यय आला आहे.रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.काही रस्ते तर वर्षातून दोन वेळा वायर टाकण्यासाठी खोदले आहेत.मग रस्ते करत असताना ही सगळी कामे एकदाच का केली जात नाहीत असा सवाल बारामतीकर करत आहेत.
बारामतीतील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरातील मुख्य भिगवण चौकातील रस्त्याच्या चारही बाजूंच्या रस्ता उखडला आहे. इंदापुर चौक ,गुणवडी चौक ,इंदापुर चौकात मोठमोठे खड्डे पडले असल्याने दुचाकी स्वारांची गाडी खड्ड्यात जोरात आपटून अनेकांना पाठीच्या माणक्याच्या आजारावर उपचार सुरू करावे लागत आहेत.
इंदापूर रस्ता ,प्रशासन भवनाच्या समोरून जाणाऱ्या रस्ताची तर पार चिरफाड झाली आहे.या रस्त्यावर दोन फुटांपेक्षा मोठे खड्डे आहेत.रस्ता दुरुस्तीसाठी खडी येऊन पडली आहे.मात्र काम करण्यासाठी कोणता मुहूर्त बघत आहेत.अशी संतप्त सवाल येथील नागरिक विचारात आहेत.अनेक रहिवाशी भागात पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या पाईप चे खड्डे बुजवले नाहीत.
पावळ्यात तर बाहेरील चारचाकी चालकाला अंदाज न आल्याने देखील अपघात झाले आहेत.शहराच्या बाह्य वळणावर असणाऱ्या शिवाजी चौक ,फलटण रोड ,ढवाण पाटील चौक ,येथे अनेक दुचाकी स्वार खड्यांचा अंदाज न आल्याने पडले आहेत.कारभारी चौक ,जगताप मळा येथील पूर्ण रस्ता उकडला आहे.रस्त्यावर खडी पसरली आहे.खंडोबानगर चौक ,महात्मा फुलें चौक , दुर्गा टॉकीज ,नेवसे रोड , मारवडपेठेतील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत.तर शहरातील सिद्धेश गल्ली ,राम गल्ली ,खाटीक गल्ली ,श्रावण गल्ली अनेक गल्लीबोळात रस्ते खराब झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी