मुंबई, २८ ऑगस्ट २०२२: दोन दिवसांत सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची सगळी तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. गणेशोत्सवात ५ सप्टेंबर ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. अमित शाह लालबागचा राजा आणि सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान वर्षावरही जाणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे मुंबई चे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांची ही अमित शाह भेट घेणार आहेत.आणि त्यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेणार आहेत. अमित शाह दरवर्षी मुंबईत येऊन गणपतीचं दर्शन घेत असतात पण महाराष्ट्रत सत्ता आल्या नंतर चा हा पहिला मोठा आणि महत्त्वाचा दौरा ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे