लाल परी ओलांडणार जिल्हातील सीमा?

मुंबई, १७ ऑगस्ट २०२०: राज्यात जसे कोरोनाने थैमान घातले आहे,अशातच अनेकांना याचा फटका बसला आहे. तर जिल्हा बंदीमुळे सर्वसामान्यांची लाल परी गेले चार महिन्यांपासून बंद आहे ज्यामधे अत्यावश्यक सेवेसाठी ती चालू आहे. पण लवकरच लाल परी हि जिल्ह्यांच्या सीमा ओलांडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तर याबाबतची आधिकृत घोषणा आज होणार असल्याचेही बोलले जात आहेत.

आता सर्व सामान्यांसाठी लालपरी हि सेवेत रुजू जरी होणार असली तरी सर्वांना कोरोना संबंधीचे काटोकोरपणे पालन करणे देखील अनिवार्य असणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या निर्णयासाठी अनुकूल असल्याचे समजत आहे. तसेच सर्वांची लाडकी लालपरीची एसटी सेवा सुरु होणार कि नाही हे आज कळणार असून अटीसह एसटी हि सध्या जिल्हा अंतर्गत धावत आहे. तर आता ती जिल्ह्याच्या सीमा ओलांडेल असे बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा