पुण्यामध्ये दोन महापालिका अस्तित्वात येणार का?

पुणे १८ जून २०२३: पुणे शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता पुण्यात अजून एक महानगरपालिका होणार याची बऱ्याच दिवसापासून कुजबूज होती.आता पुण्यात आणखी एका महापालिकेसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत.

हडपसर–वाघोली ही महापालिका तयार करा, अशी मागणी राजकीय नेत्यांसह समाजातील काही घटकांनी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आता नगरविकास विभागाचे पुणे महापालिकेला पत्र मिळाले आहे. त्यावर पुणे मनपाचे विभाजन करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडे अभिप्राय मागवला आहे.

एका आठवड्यात अभिप्राय राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. यामुळे पुण्यामध्ये दोन महापालिका अस्तित्वात येणार का ? या प्रश्नाचे उत्तरही लवकरच मिळणार आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा