नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२२ : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये ‘विप्रो’ची ओळख आहे. हीच प्रसिद्ध फर्म आता तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. कारण ‘विप्रो कंझ्युमर केअर’ने केरळमधील सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या पारंपरिक खाद्यपदार्थांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या ‘निरापारा’ला ताब्यात घेऊन पॅकेज्ड फूड आणि मसाल्यांच्या विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली; मात्र या कंपनीने करारासंबंधीचा तपशील जाहीर केलेला नाही.
विप्रो समूहाच्या युनिटने यासंदर्भात ‘निरापारा’सोबत ठोस करार केल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. यासह ‘विप्रो कंझ्युमर केअर’ने मसाल्यांच्या बाजारातही प्रवेश केला आहे. या क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये डाबर, इमामी, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि आयटीसी यांचा समावेश आहे.
विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटनिंग आणि विप्रो एंटरप्रायझेस, विप्रो एंटरप्रायझेसचे कार्यकारी संचालक विनीत अग्रवाल यांनी याबाबत प्रतिपादन करताना ‘निरापारा’ हे आमचे १३ वे अधिग्रहण आहे, मसाले तयार श्रेणीत आमचे स्थान मजबूत करेल आणि सर्वांत वेगाने वाढणाऱ्या ग्राहकांपैकी विप्रो या व्यवसायात टिकेल, असा विश्वास व्यक्त केला. सध्या ‘निरापारा’चा ६३ टक्के व्यवसाय केरळमधून येतो, उर्वरित ८ टक्के भारतातून आणि उर्वरित २९ टक्के आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून येतो, ज्यात गल्फ कोऑपरेशन कौन्सिल देशांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील