परळी येथे अज्ञातांकडून पत्रकारासह त्याच्या कुटुंबावर चाकूहल्ला

बीड, दि.१२ मे २०२० : परळी येथे अज्ञात तरुणांनी पत्रकारासह त्याच्या कुटूंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी (दि.११) रोजी सायंकाळी घडला. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांना परळी येथील जिल्हा उप रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. लोक आपल्या व आपल्या परिजनाच्या सुरक्षेसाठी धडपडत असतांना अशा नाजूक परिस्थितीत परळी येथे सायंकाळच्या सुमारास अचानक पत्रकार संभाजी मुंडे त्यांची पत्नी, मुलावर चाकूने हल्ला केला.

यामध्ये त्यांच्या मुलाला गंभीर जखमा झाल्या असून पत्रकार संभाजी मुंडे यांना ही चाकूने वार केल्यामुळे त्यांना व त्यांच्या मुलाला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला कशामुळे झाला, याचे कारण समजले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा