माढा, ५ ऑगस्ट २०२०: उजनी टेे तालुका माढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा ता.अध्यक्ष रमेश पाटील व छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. सचिन यादव यांचे करिअर मार्गदर्शन पार पडले.
ज्ञानाने विद्यार्थी जगाच्या मार्केट मधे टिकतो तर ज्ञानाने विद्यार्थी स्वतःचे , आई-वडिलांचे व कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्वल करतो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ध्येय साध्य होई पर्यंत थांबू नका. अशा प्रकारे दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. सचिन यादव यांनी मार्गदर्शन केले यावेळी उजनी टे येथील नागरिकांना प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना कार्ड (८०) व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी पास असे दोन्ही मिळून (१००) प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, आढेगावच्या सरपंच चित्राताई वाघ, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वेताळ जाधव, उजनी टे चे सरपंच सोनाली मेटे पाटील, उपसरपंच संगीता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव पाटील, पंडित पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रदीप पाटील यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी प्रदीप पाटील