अदानी संदर्भातील तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणीची शक्यता

नवी दिल्ली, १० मे २०२३: अदानी आणि अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणात तज्ज्ञ समितीने त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने सहा सदस्यीय समितीची नेमणूक केली होती. पाकिटबंद लिफाफ्यात हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

समितीकडून सादर करण्यात आलेला अहवाल अंतिम असून तज्ज्ञ समितीने आणखी वेळ मागून घेतला आहे का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शुक्रवारी, १२ मे ला या प्रकरणावर सुनावणीची शक्यता आहे. सेबीने नियुक्त केलेल्या समितीने यापूर्वी अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागितला होता. सेबीचे पॅनेल आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते.

परंतु सेबीने अदानी समुहाशी संबंधित तपासासाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त वेळ मागितला होता. सेबीला २ मे रोजीच स्थितीदर्शक अहवाल सादर करायचा होता. पण यासाठी मुदत वाढवून देण्यासाठी सेबीने अर्ज दाखल केला होता. आशात शुक्रवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा