कोल्हापूर, १५ डिसेंबर २०२०: महाराष्ट्राला कुस्तीचा एक फार मोठा इतिहास लाभला आहे. पण, याच क्षेत्रातुन एक दुःखद बातमी आली आहे. जेष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं वृद्धपकाळानं निधन झालं. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी आखेरचा श्वास घेतला.
वयाच्या ८६ व्या वर्षी श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं. तर त्यांच्या जाण्यानं कुस्ती क्षेत्र पोरकं झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर कोल्हापूरमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील पहाडी मल्ल, मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंद केसरी किताब पटकावणारे पहिलवान म्हणजे श्रीपती खंचनाळे. १९५९ ला त्यांनी पंजाब केसरी बनता चा पराभव करत हिंदकेसरी ची गदा जिंकली. याच वर्षात खंचनाळे यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब ही जिंकला होता. तसेच १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद खंचनाळे यांनी पटकावले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव