भारतीय हवाई दलाच्या ताकदीत होणार वाढ, आणखी तीन राफेल भारतात येणार

46
नवी दिल्ली, 14 ऑक्टोंबर 2021: भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. आणखीन तीन राफेल भारतात येत आहेत.  हे राफेल फ्रेंच मधून गुजरातच्या जामनगर येथील  एअरबेसवरून उतरतील.  आतापर्यंत 26 राफेल भारतात दाखल झाले आहेत.  या तीन राफेलच्या आगमनानंतर 29 राफेल भारताच्या ताफ्यात येतील.
असं सांगितलं जात आहे की, भारतात 29 राफेल आणल्यानंतर उत्तर आणि पूर्व सीमेवर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानं तैनात केली जातील.  राफेल हे पहिलं y विमान आहे जे शत्रूच्या हवाई संरक्षणास पराभूत करण्यास आणि तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
 भारतीय हवाई दलाने या वर्षी 28 जुलै रोजी पूर्व हवाई कमांड (ईएसी) मधील हवाई दल स्टेशन हसीमारा येथे क्रमांक 101 स्क्वाड्रनमध्ये राफेल विमानांचा औपचारिक समावेश केला.  101 स्क्वाड्रन हे हवाई दलाचे दुसरे स्क्वाड्रन आहे, ज्यात राफेल तैनात करण्यात आले आहे.
 हा करार 2016 मध्ये झाला होता
  सप्टेंबर 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेलचा करार झाला.  पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील वादापासून राफेलचा पुरवठा भारतात झपाट्याने होत आहे.  देशाच्या सीमेवर हवाई दलाला बळकट करण्यासाठी हे राफेल अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे