महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून अपमानास्पद वागणूक

मुंबई : मागील आठवड्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची संधी गमावली. त्यामुळे भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यांनतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर महिला भारतीय संघाला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने बीसीसीआयावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात भारतीय संघ मायदेशी परतला तेव्हा संघाचे विमानतळावर स्वागत करण्यास कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. टी २० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रथमच पोहोचून इतिहास घडवल्यानंतरही संघाचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले नाही.
यावेळी देखील भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्वागत करायला बीसीसीआयतर्फेही कोणी उपस्थित नव्हते. अंतिम फेरी गाठल्यानंतरही भारतीय संघातील खेळाडूंच्या संबंधित राज्य सरकारांनी अद्याप कोणताही पुरस्कार जाहीर केलेला नाही. अशी वागणूक मिळाल्यामुळे बीसीसीआयवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा