वृद्ध दांपत्याच्या भांडणात महिलेचा मृत्यू

पुरंदर, दि. ८ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील निरा येथील वृद्ध महिलेच्या डोक्यात बॅट मारल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या पतीनेच किरकोळ वादातून हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शी लोकांनी सांगितले आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा येथील वार्ड नं. सहामध्ये राहणारे जमेला दस्तगीर पठाण वय ५५ वर्ष  व दस्तगीर सिकंदर पठाण वय ६० वर्षे यांच्या मध्ये आज सकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे कारण अद्याप समजू शकले नाही. वादाचे रूपांतर हणामारीत झाले. पती दस्तगीर पठाण यांनी पत्नी जमेला हिच्या डोक्यात बॅट मारली. मार जिव्हारी लागल्याने डोके फुटले त्यामुळे ही महिला जागीच ठार झाली. यानंतर नीरा येथील पोलीस राजेंद्र भापकर व पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ही महिला मृत झाली होती.

यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा