गोल पोस्ट महाराष्ट्र लवकरच संपूर्ण राज्य होणार कुपोषणमुक्त

लवकरच संपूर्ण राज्य होणार कुपोषणमुक्त

संपूर्ण राज्य होणार कुपोषणमुक्त;

Maharashtra Malnutrition-Free Campaign: संपूर्ण महाराष्ट्रा लवकरच कुपोषणमुक्त होणार असून गेल्या 2 वर्षांत कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी विविध यंत्रणांनी केलेले प्रयत्न आणि राबवलेल्या उपाययोजनांना योग्य ते यश मिळत असून ,अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 1.93 वरून 0.61 % तर मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण 5.9 वरून 3.11 टक्क्यांवर आले आहे. यात अतितीव्र कुपोषण असलेली बालके 2023 मध्ये 80,248होती, ती संख्या 2025 मध्ये 29,107 इतकी कमी झाली आहे. मध्यम कुपोषितांची संख्या 2,12,203 वरून 1,49,617 वर आली आहे. वर्ष 2023 मध्ये वजन आणि उंची मोजणीसाठी 41 लाख 67 हजार 180 बालकांचा समावेश होता, जो 2025 मध्ये 48 लाख 10 हजार 302 इतका झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या कामगिरीचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले असून यासाठी काम केलेल्या अधिकारी, घटकांचे, क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या सर्वांचेच कौतुक केले तसेच त्यांनी सामाजिक न्याय, मानव विकास आणि महिला-लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे असल्याचे सांगितले. 100% आहार पुरवठा, अचूक नोंदणी, वैयक्तिक लक्ष, नियमित गृहभेटी आणि सूक्ष्म नियोजनामुळे कुपोषणात लक्षणीय घट झाली आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार उपाययोजना राबविल्या जात असून नियमित आढावा, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यामुळे राज्यात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

आदिवासी प्रकल्पांतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना चौरस आहार, बालकांना केळी व अंडी दिली जात असून अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम व नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येथे 3 वेळा पोषक आहार व आरोग्यसेवा दिली जाते.

NURTURE आणि पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे संनियंत्रण केले जाते.यात महत्वाचे प्रयत्न महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आहेत , 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पुरक पोषण आहार, गरोदर व स्तनदा मातांना घरपोच आहार , तसेच 3 ते 6 वर्षांतील बालकांना गरम ताजा आहार नियमितपणे दिला जात आहे. यामुळेच या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांना हे यश संपादन झालं असून आपल्या सर्वांसाठीच हि महत्वाची कामगिरी आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी; तनया रेडकर

error: Content is protected !!
Exit mobile version