पेण, २४ फेब्रुवारी २०२४ : पेण तालुक्यातील रावे गावात काल हळदीकुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या प्रसंगी भाजपच्या महिला मोर्चाच्या महामंत्री डॉ. मंजुषा कुंद्रीमोती या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सातशे ते आठशे महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियोजित या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना मागील दहा वर्षात मोदी सरकारने महिलांसाठी घरोघरी नळ योजना राबवली आहे. गावा गावापर्यंत पाणी पोहोचविले आहे. त्यामुळे या दहा वर्षात खऱ्या अर्थाने देशाची उत्क्रांती झाली आहे. कोविड काळात अनेकांनी आपल्या गावाकडे धाव घेऊन स्वतःचे उद्योगधंदे सुरु केले. महिला स्वावलंबी बनल्या आणि स्वतः घरात बसून विविध प्रकारच्या वस्तू बनऊ लागल्या. ते उद्योगधंदे आजही यशस्वीरीत्या सुरु असल्याने कोविड काळात खऱ्या अर्थानं देशाचा जिडीपि वाढला असल्याचे डॉ. मंजुषा कुंद्रीमोती यांनी सांगितले. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष शर्मिला पाटील यांनी भाजपने संरक्षण मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांसारख्या महिला व्यक्तिमत्त्वाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली म्हणजेच भाजपने महिलांवर मोठी जबाबदारी देऊन महिलांचा मान सन्मान वाढविला असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौसल्या पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा हेमाताई मानकर, जिल्हा उपाध्यक्ष शर्मिला पाटील, जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, जिल्हा समन्वयक तृप्ती मामले, जिल्हा सरचिटणीस दीप्ती नकाशे, तालुका अध्यक्ष तन्वी पाटील, तालुका चिटणीस स्नेहल सावंत उपस्थित होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्नील पाटील