पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

23

बारामती, २८ ऑक्टोबर २०२०: बारामती फलटण रस्त्यावरील प्रभाग क्रमांक १९ मध्ये असणाऱ्या जाधव वस्तीतील १०० कुटुंबांना आठवड्यातून दोनदा पिण्याचे पाणी येते. आज सहा दिवस झाले तरी पिण्याच्या पाण्याचा टँकर आला नाही. तर संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले असता काहींचे फोन बंद असतात तर काही अधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करतात अशी तक्रार येथील संतप्त महिलांनी केली आहे.यावेळी महिला लहान मुले हांडे घेऊन रस्त्यावर आल्या होत्या.

बारामती फलटण रोडवरील प्रभाग क्रमांक १९ मधील जाधव वस्ती ही सात वर्षांपूर्वी बारामती पालिकेच्या हद्दीत आली आहे. येथे मोठी लोकवस्ती असुन बारामती नगर पालिकेचा पाण्याचा टँकर आठवड्यातून बुधवार व शनिवारी दोन वेळा येतो. आमच्याकडे पाण्याची मोठी भांडी नाहीत तर जास्त पाणी भरून ठेवल्यावर त्यात किडे पडल्याने त्रास झाला आहे. पालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी फोन उचलत नाहीत आणि टाळाटाळ करतात. आम्हाला नियमित पाणी मिळावे व त्याची वेळ ठरवून द्यावी अश्या संतप्त महिलांनी सांगितले.

आमचा पाण्याची वाट बघण्यात दिवस दिवस जातो. १०० कुटुंब पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. तर टँकर मधून चारच हांडे मिळतात त्यात काय काय करायचे पाणी नसल्याने खूप अडचणी येतात. आज लहान मुलांना पिण्यासाठी पाणी नाही तर कधी कधी स्वयंपाकाला सुद्धा पाणी नसते असे सांगताना महिलांना भरून आले.

लवकरात लवकर आमची पाण्याची व्यवस्था झाली नाहीतर आम्ही नगर पालिकेसमोर आंदोलन करू असे राजाबाई मोहिते, बेबी गायकवाड, सरस्वती माने, मंगल साळवे, रुक्मिणी मोहिते यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व लहान मुलं हांडे घेऊन रस्त्यावर आल्या होत्या.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा