आयटी, बीपीओ कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होमची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

11

नवी दिल्ली, २२ जुलै २०२० : कोविड १९ चा प्रादुर्भाव देशात सर्वत्र वाढत आहे. काहींच्या मते आता देशात कम्यूनिटी स्प्रेड होण्यास सुरूवात झाली अाहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने आयटी आणि बीपीओ कंपन्यांसाठी घरातून काम करण्याच्या मुदतीला आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविले आहे.

दूरसंचार विभागाने काल रात्री केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे अधिक चिंता वाढली आहे, या चिंतेचा विचार करता सर्व सेवा पुरवठादारांच्या अटी व शर्तींमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत वाढ केली आहे. घरातून काम करण्याचा कालावधी ३१ जुलै रोजी संपत होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी