नाशिक,३ नोव्हेंबर२०२२: नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये आता भारतीय चलनासोबतच नेपालच्या १ हजार रुपयांच्या चलनी नोटांची देखील छपाई होणार आहे. नेपालच्या चलनी नोटा छापण्याचे काम मिळाल्याने कामगार मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांच्या नोटांची छपाई झाली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात ही छपाई बंद झाली होती. परंतू आजही जवळपास ५० ते ६० देश आपले चलन बाहेरच्या देशातून छापून घेतात.
त्यामुळे आता नाशिकच्या नोट प्रेसमध्ये एक्सपोर्ट डिपार्टमेंट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून बाहेरचे देशांचे करन्सी छापण्याचे काम मिळवता येईन, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं नोट प्रेस मजूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर