जागतिक अपंग दिन विशेष

अपंगत्वावर मात करणारे दहा प्रेरणादायी व्यक्तिमत्व

आज 3 डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अपंगत्व तुमच्या मनात आहे, माझ्यात नाही, हे सांगणाऱ्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती आज आपण जाणून घेऊ…

हेलन केलर : मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व व अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या त्यांच्यावर कोसळली. या अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्या अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका व समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.

लुईस ब्रेल : वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.

सुधा चंद्रन : एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.

ऑस्कर पिस्टोरियस : पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित ११९, २०० व ४०० मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहे.

स्टीफन हॉकिंग : या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा आजार झाल्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.

बी.एस.चंद्रशेखर : चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.

मन्सूर अली खान : टायगर पतौडी यांनी कार अपघातात उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवत कप्तानपदाची धुरा सांभाळली. एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक असा लौकिकही मिळवला.

अरुणिमा सिन्हा : चोरट्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याने समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांच्या पायाचा लचका तोडला. तरीही त्यांनी जिद्दीच्या जोरावर ‘एव्हरेस्ट’ पार केले. त्यांच्या या कर्तृत्वाचा सत्कार म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ देण्यात आला.

जेसिका कॉक्स : हात नसतानाही पायलटचा परवाना मिळवणारी ती जगातील पहिली महिला ठरली. ती तिच्या पायांनी विमान उडवते. २००८ मध्ये पायलट परवान्यासह तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

दीपा मलिक : २९ व्या वर्षी पॅरालेसिस झाल्यानंतरही स्पोर्ट्स डेस्क- रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिक गेम्समध्ये दीपा मलिकने थाळीफेकमध्ये सिल्वर मेडल जिंकले. हे मेडल जिंकणारी पहली भारतीय महिला पॅरा अॅथलीट ठरली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा