वर्ल्ड पॅलेटीव्ह केअर डे…

पुणे, १० ऑक्टोंबर २०२०: आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी अवस्था येते की आपल्याला किंवा आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजाराचा सामना करावा लागतो. यावेळी आपण मानसिक दृष्टीनं सर्वात जास्त कमजोर झालेलो असतो किंवा आपण पुढील येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार नसतो. याचं कारण असं असू शकतं की या गोष्टींबद्दल आपण जास्त कोणाशी बोललेलो नसतो किंवा आपल्याला याविषयी माहिती देखील नसते. वृद्धावस्थेच्या काळात जडलेल्या गंभीर आजारपणामुळं डोळ्यासमोर दिसतो तो भयावह मृत्यू. वेदनेनं ग्रासलेलं उर्वरित आयुष्य. पण, प्रत्येक वेळेस हे असेच असू शकतं असं नाही. अशी परिस्थिती ओढवल्यावर सहाजिकच कोणीही विचलित होऊ शकतं.

पण खरंच का एवढ्या चिंतेत उर्वरित आयुष्य जगण्याची गरज आहे? तर याचं उत्तर आहे नाही… वृद्धावस्थेत असलेल्या अनेक व्यक्तींना आशेचा किरण म्हणून अनेक संस्था, रुग्णालयं काम करत आहे. त्यांच्या या कार्याला महत्त्व प्राप्त करून देणारा आजचा दिवस आहे. आज ‘वर्ल्ड पॅलेटीव्ह केअर डे’ आहे. ही रुग्णालयं किंवा संस्था केवळ वयोवृद्ध रुग्णांसाठी नव्हे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा सर्वांसाठीच आहे.

दरवर्षी ऑक्टोबर’च्या दुसऱ्या शनिवारी वर्ल्ड पॅलेटीव्ह केअर डे जगभरात साजरा केला जातो. यावर्षी हा १० ऑक्टोबर म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे. आजचा हा दिवस त्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष आहे जे आपला पूर्ण वेळ अशा रुग्णांच्या सेवेत घालवतात व त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये किंवा कठीण काळामध्ये आनंद पेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या समर्पणासाठी आपण नेहमी कृतज्ञ राहू…

जर आपल्याला अशा पॅलेटीव्ह केअर सेंटर्स विषयी जास्त माहिती नसेल तर आम्ही इथं या सेवांशी संबंधित एका रुग्णालया विषयी माहिती देत आहोत. ‘पॅलेक्स हेल्थकेअर सोल्युशन्स’ हे रुग्णालय अशाच सेवांशी संबंधित आहे. सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांवर तसेच वृद्धापकाळामुळं आलेला थकवा, इतर गंभीर आजार या सर्वांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी घरगुती वातावरणात उपचार केले जातात. निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून हे रुग्णालय हे काम करत आहे. माहितीसाठी रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक देखील येथे देत आहोत.
पॅलेक्स हेल्थकेअर सोल्युशन्स: ०२०-२७२९८९९८/२७२९७९८०

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा