विश्वविक्रमी शेफ विष्णू मनोहरांनीं बनवला दोन हजार किलोंचा खुसखुशीत महाचिवडा, फूड डे चे औचित्य

नागपूर, १७ ऑक्टोबर २०२२: तीन तासात ७००० किलोची महा मिसळ, ३००० किलो खिचडी, ३२०० किलो वांग्याचे भरीत, २५०० किलो डाळीचा महाप्रसाद, ५००० किलो खिचडी, ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा “सर्वात लांब पराठा”, सलग ५३ तास स्वयंपाक असे अनेक विश्व विक्रम करणारे जगातील एकमेव सुप्रसिद्ध शेफ ‘विष्णू मनोहर’ यांनी रविवार १६ ऑक्टोबरला जागतिक फूड डे साठी २ हजार किलो महाचिवडा तयार करून आणखी एक विक्रम केला आहे. महाचिवड्याचा मनोहर यांचा हा १४ वा विश्व विक्रम राहाणार आहे.

नागपूरात विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी ९ ते ११ या वेळेत हा महाचिवडा तयार करण्यासाठी, उज्जैन येथून आणलेली खास ६०० किलो चिवडी म्हणजेच चुरमुर्याचा एक प्रकार तसेच शेंगदाणा तेल ३५० किलो, शेंगदाणे १०० किलो, काजू व किसमीस १०००, डाळवा व खोबरे प्रत्येकी ५०, हिंग व जीरे पावडर प्रत्येकी १५ किलो, मिर्ची पावडर ४०, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी १००, वाळलेले कांदे ५० किलो, धने पावडर ४० किलो एवढा जिन्नस लागला.

दिवाळी ही चिवड्याशिवाय होत नाही. त्यातही चिवडा आवडता असतो. चिवडा केवळ दिवाळीतच नाही. तर वर्षभर घरोघरी होतो. म्हणून दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले.

कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते या महाचिवड्याचे मोफत वितरण करण्यात आले. साधारण प्रत्येकाला अर्धा किलो चिवड्याचे पाकीट देण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा