आंतरराष्ट्रीय शौचालय दिन विशेष

78

शौचालय बांधा…अस्वच्छता टाळा…

दरवर्षी १९नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय संघटनेच्या ( world toilet organization-WTO) नेतृत्वाखाली जगभरात “जागतिक शौचालय दिन”पाळला जातो. १४५ देशांमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ५८ टक्के अतिसार हा
अस्वच्छतेमुळे होतो.
अतिसार या आजारामुळे आतापर्यंत साडेपाच लाख हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून शौचालयाला प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी शौचालय संघटनेने शौचालयांची अस्वच्छता, त्यापासून होणारे आजार, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या शौचालयांची समस्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडली. संयुक्त राष्ट्राने निश्चित केलेल्या २०३० शाश्वत विकास लक्ष्य ६ अंतर्गत २०१३साली मानवाची महत्वाची गरज म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर मान्यता दिली.
जागतिक शौचालय संघटना ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे. ही संस्था जगभरातील शौचालय संदर्भातील परिस्थितीत सुधारणेसाठी जबाबदार आहे. २०१४ साली १८ते २०नोव्हेंबर या काळात पहिला आंतरराष्ट्रीय शौचालय महोत्सव दिल्लीत आयोजित केला गेला होता. तेव्हापासून १९ नोव्हेंबर हा दिवस ” आंतरराष्ट्रीय शौचालय दिन”म्हणून पाळण्यात येतो.

भारतात आजही कित्‍येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्‍यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते. जेंडर बजेटमध्ये लाखोंची तरतूद होऊनही कधी प्रशानाची टाळाटाळ तर कधी वित्‍तीय संकटामुळे लोक शौचालय बांधत नाहीत. ही महासत्‍ता होऊ पाहणाऱ्या भारतासाठी दुर्देवी बाब आहे.
महाराष्‍ट्र संताची भूमी आहे. अनेक थोर महात्‍मे महाराष्‍ट्रात घडून गेले आहेत. त्‍यापैकीच एक ‘ गाडगेबाबा ‘ होते. स्‍वच्‍छतेचे महत्‍व सर्वप्रथम गाडगेबाबा यांनी समाजाला करुन दिले. त्‍यांनी स्‍वत: हातात झाडू घेऊन रस्‍त्‍यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्‍या माध्‍यमातून लोकांच्‍या डोक्‍यातील घाण साफ केली. त्‍यांना स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून दिले होते.
ग्रामीण भागात आजही बऱ्याच ठिकाणी उघड्यावर शौचालयास जावे लागते. याची दखल घेणे गरजेचे आहे.

जेव्हा सर्व जण या गोष्टी चे काटेकोरपणे पालन करतील त्या दिवशी खरा शौचालय दिन साजरा होईल.