जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात होणार सुरू: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, ४ जानेवारी २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की, “औषध नियामकांनी दोन लसींच्या मर्यादित आणीबाणी वापरास मान्यता दिल्यानंतर देशातील कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे.”

‘भारतात उत्पादित’ लसींबद्दल त्यांनी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचे कौतुक केले आणि म्हणाले की, देशाला त्यांचा अभिमान आहे.

मोदी म्हणाले, “जगातील सर्वात मोठा कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होईल. यासाठी आपल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांच्या योगदानाबद्दल देशाचा अभिमान आहे. ”

राष्ट्रीय मापन प्रणाली परिषदेत वैज्ञानिकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, “भारत निर्मित” उत्पादनांची जागतिक मागणीच नव्हे तर त्यांची जागतिक मान्यतादेखील आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, “एखाद्या उत्पादनाच्या उत्पादनक्षमते प्रमाणेच त्याची गुणवत्ता देखील तितकिच महत्त्वाचे असते ‘आत्मनिर्भर भारत’चे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याबरोबरच आमची मानकेही उंचावली पाहिजेत. ”

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफोर्ड कोविड -१९ लस ‘कोविशिल्ड’ च्या देशातील मर्यादित आपत्कालीन वापरास आणि भारतीय बायोटेकच्या स्वदेशी विकसित लस ‘कोव्हॅकसिन’ ह्या दोन्ही लसिना भारतीय औषध नियामक मंडळाने काल आपत्कालीन वापरास मान्यता दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: किरण लोहार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा