सुर्यग्रहण काळात नीरा नदीत उपासना

पुरंदर, दि. २१ जून २०२० : आज सुर्य ग्रहण होत आहे. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मियांत वेगवेगळ्या साधना आहेत. ग्रहण काळात ध्यान, साधना, आराधना, नामस्मरण, करण्यात येते. नीरा नदीच्या पवित्र तिर्थामध्ये आज काही साधक आपली साधना करत आहेत. नदीच्या पाण्यामध्ये बसून किंवा उभे राहून मंत्र्यांचा जप किंवा ग्रंथांचे वाचन करत आहेत.

ग्रहणाच्या काळात वेगवेगळ्या विधी केलेल्या जातात. आज होत असलेले सुर्य सकाळी १० ते १.३० वाजेपर्यंत सुरू आहे. या काळात नीरा दत्त मंदिरा समोर नदीच्या पाण्यात कही साधक उघड्या अंगाने बसलेले अथवा उभे होते. ग्रहण काळ या साधकांसाठी एक अनन्य साधारण काळ असतो. या साधने वेळीही या लोकांनी कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन केले होते. प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये अंतर होते. कोणी गुडघाभर तर कोणी कंबरे इतके पाण्यत बसले होते. हातामध्ये जपाची माळ घेतली होती तर काही साधक धर्मग्रंथांचे पाण्याच्या काठावर बसून वाचन करत होते.

चंद्रग्रहण किंवा सुर्यग्रहण काळात साधना करणा-या उपासकांचा पर्वणीचा काळ असतो. या काळात साधना केली असता अध्यत्मिक ज्ञानात भर पडते. त्याचे फलस्वरुप ज्ञानात कैक पटीने वाढ होते. नदी, सरोवर, समुद्राच्या काठावर किंवा मंदिरात साधना केली जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा