टोल नाक्यावरील सावळा कारभार…

तुम्ही प्रवास करताना तुम्हाला अनेक टोल नाके लागले असतीलच आणि त्या बरोबर वाईट चांगले अनुभव आलेच असतील. आज अश्याच एका टोल नाक्यावरील अनुभव मी आपल्या बरोबर शेयर करणार आहे. महाराष्ट्रात टोलनाक्याच्या वसुली विरोधात जर कोणता पक्ष सर्वात पुढे असेल तर तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी मनसे च्या रूपाली पाटील यांनी किणी टोल नाक्यावर मनसे स्टाइल ने खळखट्याक केला होता. मुळात टोल नाक्यावरील मेनेंजमेंटनेच काही नियम ढाब्यावर बसवल्या मुळे हे कठोर पाऊल रुपालीताई पाटील यांनी उचलले होते.पण त्या नंतर ही परिस्थिती जैसें थे तीच राहील्याचे दिसून आले.
“एक प्रवास” टोल नाक्यावर अरेरावीची भाषा……
मी व माझे सहकारी कामानिमित्त कोल्हापूर प्रवासासाठी निघालो होतो. पहीला खेड शिवापूर टोल नाका लागणार हे आम्हाला माहिती होते. पण त्या टोलनाक्यावर जवळ पास अर्धा ते पाऊनतास आम्हाला वाट पाहावी लागली एक किलोमीटर पर्यंत वाहनांची लांब रांगच लागली होती आणि केंद्र शासनाच्या फास्ट टैग कायद्याचेही तीन तेरा वाजले होते.
खेड शिवापूर चा टोल नाक्यावर वर मध्यंतरीच एका पत्रकारांने तेथील अधिकार्यांच्या उर्मट आणि उद्धटपणाचा चेहरा समोर आणला होता. “आम्हीच ठरवतो टोलचे नियम…. तुम्हाला काय करायचं ते करा… कुणाला बोलवायचे बोलवा…. पोलिसांना बोलवा…. पण तुम्हाला येथून सोडणार नाही….तुमची गाडी क्रेन  लावून नेऊ…. ” आश्या भाषेत त्यांना बोलले होते. तर नंतर ते पत्रकार आहे हे कळल्यावर त्यांना सवलत नको आसताना, टोल आधिकारी आणि स्थानिक पोलीसांनी त्यांना सवलत देत सोडून देण्याचे  काम केले होते.
पुढे सातार्याच्या अलीकडे आनेवडे टोल लागले जिथून आमची गाडी व्यवस्थित पुढे गेली. तिथे ही गर्दी होतीच आणि पंधरा मिनिटांचा वेळ लागला. पण, आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला लागलो.
तासवडे टोलनाक्यावर अधिकारी की गुंड?……
गाडी तासवडे टोल बूथ वर पोहचली तिथे आम्हाला काही बोलण्याच्या आतच “ये गाडी मागं घे आणि दिडशे रुपये भर…. ” असा जणू दमच  देण्यात आला. तेव्हा आम्ही म्हटलं दिडशे कसले फलक कुठे आहे दाखवा, “ये ते काय नाय दिडशे रुपये भर… “आता आमच्या गाडीतील सहकार्यांनी पुन्हा दिडशे कसले विचारले आमच्या कडे फास्ट टैग आहे. त्यावर तो पुन्हा दरडावला ” फास्ट टैग आहे तर मग काय बाजूला पुजा करायला ठेवला काय?….” त्याच्या या उर्मट आणि उद्धटीच्या वागण्यावर आम्ही मैनेजर शी बोलण्याचे ठरवले आणि त्याला मैनेजर ला बोलवायला लावले.
मैनेजर आल्यावर तोही त्या टोल बूथ वरील अधिकार्याप्रमाणे च उर्मट पणे बोलू लागला. तेव्हा त्याला “आम्हच्याही घरी सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचे कार्ड आम्ही दाखवले”. (सहकारी च्या वडिलांचे होते) तेव्हा ते कार्ड त्याने घेतले आणि स्वतःकडे जमा केले.आणि वर पुन्हा अनेक प्रकाराची अरेरावीची उर्मट भाषा बोलू लागला. ” तुम्हाला मी कोण आहे माहिती नाही….उगाच माझ्या नादाला लागू  नका” तेव्हा आम्ही नाव विचारले असता “माझ्या घरचा पत्ता सांगू का?” म्हणून पुन्हा एकदा आपला उद्धटपणा त्याने सिद्ध केला. आणि या सर्वात त्याच्या सहकार्याच्या उर्मट पणा बद्दल तो काही बोललाच नाही. त्यातही तो सहकारी आम्हाला धमकी देऊ लागला “गाडीच्या खाली उतरा मग दाखवतो म्हणून” शेवटी कार्ड परत आम्हाला न देता सहकारीच्या वडिलांनाच देणार असे त्याने म्हटले. त्यासाठी अनेक पुरावे त्याला आम्ही देऊन ही त्याचा उद्धटपणा काही गेला नाही. शेवटी आम्हीच तेथून पुढे गेलो.
वाहनचालकांना आम्ही काही विचारले असता आलेली उत्तरे……
तासवडे टोलनाक्यावर आमच्या बरोबर घडलेला प्रकार हा फक्त आमच्या बरोबरच नव्हता तर या टोल बूथवर सर्व टोलचे आधिकारी अशीच उर्मट भाषा वापरत असल्याचे प्रवाश्यांनी आम्हाला सांगितले. पुणे कोल्हापूर च्या या टोल बूथ वरील कर्मचारी हे गुन्हेगारी क्षेत्रातील आसून ते इथे मुद्दाम बसवल्याचे ही एका प्रवाश्यांने न सांगण्यच्या अटीवर सांगितले.
यात काही प्रश्न उपस्थित होतात त्याला जबाबदार कोण?…..
टोल बूथ वर गाडीतील प्रवाश्यांना फास्ट टैग दिसला नाही तर विचारणा  का करण्यात आली नाही?
ज्यांच्याकडे फास्ट टैग आसून ही १५० रु भरायला लावणे कितपत योग्य?
प्रवाश्यांना विश्वासात घेऊन समजवणे सोडून अश्या उर्मट आणि उद्धटपणा ने उत्तरे धमकी देणं कितपत बरोबर आणि याला जबाबदार कोण?
जर टोल बूथ वर बसलेले कर्मचारी गुन्हेगारी क्षेत्रातील असतील तर मग प्रवाश्यांचे जीव सुखरुप आहेत का? उद्या तिथे काही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?
प्रवाश्यांने टोल वसुलीचे दर जाणून घेण्यासाठी फलक असतो तो का दाखवण्यात आला नाही?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टैग वरुन वाहण्याची गर्दी कमी होईल आणि सर्व वेळेत पोहचतील असे आश्वासन जनतेला दिले होते. पण, यापेक्षाही आधी प्रवासी जीवाचे संरक्षण करण्यासाठी टोल बूथ वर जे नियम आहेत आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य भारताचे जबाबदार नागरिक कामावर ठेवणे गरजेचं आहे. ही घटना या एका टोल बूथ वर घडली नसून अनेक टोल बूथ वर घडली आहे.तर VIP लोकांसाठी लगेच जागा करुन दिली जाते. पण, अनेक वेळा नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेला ही या त्रासाचा सामना करावा लागतोय.
हे सर्व नियम टोल नाक्यावरील अधिकार्यांनी धाब्यावर बसवले आहेत. सरकाराला तिजोरी भरण्याशी मतलब……
टोल बूथ पासून शंभर मिटर चा एक पिवळा पट्टा आखलेला असतो. जर वाहनांची रांग या पिवळ्या पट्याच्या बाहेर गेली तर, शंभर मिटर पट्याच्या बाहेरील सर्व वाहने मोफत सोडावीत.
तसेच पिवळ्या पट्ट्याच्या आत ३ मिनीटा पेक्षा जास्त वेळ लागला तर ही आपण टोल भरून नये.असा राज्य शासनाचा आदेश आहे.
या नियमाचे उल्लंघन टोल कर्मचारी करत असतील तर, पोलीसांशी संपर्क साधून लिखीत तक्रार टोल कंपनी विरोधात करावी.
तर मग या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही टोलनाक्या विरोधात जो आक्रमक पवित्रा घेत आहे. तो एक प्रकारे योग्यच करत असल्याचे दिसून येते.टोल बूथ वरुन अनेक वेळा राजकारण तापले आहे.पण वेळोवेळी आणि पावलोपावली योग्य पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तो व्यवस्थित हाताळल्याचे पहायला मिळाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा