दहावी-बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली, ३ फेब्रुवरी २०२१: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी काल दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. दोन मुख्य विषयांच्या परीक्षांमध्ये पुरेसा अवधी देण्यात आला असल्याचे मंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर करताना सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल, असेही ते म्हणाले. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

यामध्ये १० वी च्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा ७ जून पर्यंत चालणार आहेत. परीक्षेचा वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १ असा असणार आहे. तर १२ वीच्या परीक्षा देखील ४ मे पासून सुरू होत आहेत. या परीक्षा ११ जून पर्यंत चालू राहणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा