पुणे, 16 मार्च 2022: चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने आपला फ्लॅगशिप Xiaomi 12 Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने तो जागतिक स्तरावर लॉन्च केला आहे. कंपनीने Mi ब्रँड संपल्यानंतर हा पहिला फोन आहे आणि आता Mi ऐवजी Xiaomi चा वापर केला जाईल.
Xiaomi 12 Pro चे डिझाईन काही इतर हाय-एंड Xiaomi स्मार्टफोन्स आणि इतर चीनी स्मार्टफोन्ससारखे आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.73 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे.
Xiaomi 13 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे आणि या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने हा 8GB आणि 12GB रॅम वेरिएंटसह लॉन्च केला आहे. टॉप वेरिएंटमध्ये 256GB स्टोरेज देण्यात आले आहे.
Xiaomi 12 Pro मध्ये 4,600mAh बॅटरी आहे आणि 120W फास्ट चार्ज सपोर्ट आहे. यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे जो 50W पर्यंत आहे.
Xiaomi 12 मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, दुसरा 115 डिग्रीचा अल्ट्रा वाइड लेन्स आहे, तर एक टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे जो 2X आहे. सेल्फीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फ्लॅगशिपच्या बाबतीत या स्मार्टफोनमध्ये काहीही ग्राउंडब्रेकिंग नाही. कारण या स्पेसिफिकेशन्सचे स्मार्टफोन आधीच बाजारात लॉन्च झाले आहेत. त्यामुळे हा फोन बाजारात आपली छाप पाडू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi 12 Pro ची विक्री $999 पासून सुरू होईल. किंमत खूप जास्त आहे आणि अशा परिस्थितीत, या फोनला Samsung च्या फ्लॅगशिप Galaxy S22 Ultra कडून टक्कर मिळेल.
सध्या हा फोन जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. Xiaomi साठी भारतात मोठी बाजारपेठ आहे, परंतु कंपनी भारतात फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याचे टाळते. यावेळी कंपनी भारतात आपला फ्लॅगशिप लॉन्च करेल की नाही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे