मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील आतापर्यंत चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहेत.
या ४ जणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ४मंत्र्यांचा समावेश आहे. यातील शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीच्या २ मंत्र्यांचा समावेश आहे.
▪ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : वर्षा बंगला
▪ छगन भुजबळ (राष्ट्रवादी) : रामटेक बंगला
▪ एकनाथ शिंदे (शिवसेना) : ‘रॉयलस्टोन’ बंगला
▪ जयंत पाटील (राष्ट्रवादी) : ‘सेवासदन’ बंगला
दरम्यान, शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, तर काँग्रेस तर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना अद्याप बंगला वाटप करण्यात आला नाही.