“या” कारणामुळे मला केलं होतं रिजेक्ट

मुंबई: काही दिवसात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ मध्ये राधिका मदान ही अभिनेत्री आपलं नशीब आजमावणार आहे. राधिकाचे नाव इंडस्ट्रीसाठी नवीन असले तरी तिने मोठ्या कष्टाने तिने या क्षणापर्यंत  मजल मारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राधिकाने तिला संघर्षकाळात झालेल्या त्रासाबद्दल खुलासा केला आहे.
याबाबत राधिका म्हणाली की, मला एका डायरेक्टरनं कास्टींगसाठी बोलावलं होतं. मला सांगण्यात आलं की, मी जास्त सुंदर दिसत नाही.
मात्र डायरेक्टरला माझी अ‍ॅक्टींग आवडली होती. मला त्यांनी सांगितलं की, तू जास्त सुंदर हवी होतीस. हे एक मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे.
सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की, तू जास्त छान दिसत नाहीस आणि मला त्यांनी रिजेक्ट केलं.
मी स्टुडेंट ऑफ द ईयरचं ऑडिशन दिलं. परंतु मी रिजेक्ट झाले. यानंतर मी आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं. मी पटाखाचं ऑडिशन दिलं आणि सिलेक्ट झाले. मी चार भागात ऑडिशन दिलं होतं जे खूप अवघड होतं.
दरम्यान, अंग्रेजी मीडियम हा चित्रपट १३  मार्च रोजी रिलीज होणार असून अभिनेता इरफान खान, अभिनेत्री करीना कपूर आणि राधिका मदान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा