‘या’ ठिकाणी केवळ ३ तासच उगवतो सूर्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): रशियातील याकुटीया हा जगातला सगळ्यात थंड परिसर आहे. या ठिकाणी थंडीच्या वातावरणात फक्त ३ तास सुर्य उगवतो. तर उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य २१तास असतो.
जेव्हा तापमान -५२ डीग्रीच्या खाली जाते. त्यावेळी शाळांना सुट्टी दिली जाते. सध्याच्या काळात या ठिकाणचे वातावरण -४४ डीग्री इतके आहे. याकुटीयाची एकूण लोकसंख्या ३ लाख इतकी आहे. या ठिकाणी पोस्ट ऑफिस, बॅंक आणि हॉस्पीटल सुद्धा आहेत. याकुटीया हे ठिकाण मॉस्को पासून ३,३०० मैल अंतरावर आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतो म्हणून या ठिकाणचे कलाकार बर्फाचे पुतळे तयार करतात. येथे जनावरांच्या चामडीपासून कपडे तयार केले जातात. (मुख्यतः हरणाच्या चामडीपासून) याकुटीया हे गॅस, सोनं आणि कोळश्याच्या साठ्यांकरीता प्रसिध्द आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा