नवी दिल्ली, दि. ३१ मे २०२०: वन प्लस हा मोबाईल जागतिक दर्जाचा आहे. सध्या आयफोन च्या बरोबर हा फोन मांडला जात आहे. उच्चप्रतीची फीचर आणि डिझाइन साठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. परंतु याची किंमत बघितली तर ती सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारी आहे. तुम्हालाही अशी इच्छा होत असेल की हा वर्ल्डकलास स्मार्टफोन आपल्या हातात असावा. परंतु किमतीशी तडजोड करावा लागतो. पण आता या स्मार्टफोन वर तब्बल दहा हजारापर्यंत ची सूट मिळणार आहे.
कंपनीच्या या डिव्हाईसेसची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अमेझॉन इंडिया आणि oneplus.in वरून केली जात आहे. कंपनी वन प्लस सेवन पासून वन प्लस एट पर्यंत जवळपास सर्वच मॉडलवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. जर तुम्हाला वनप्लस स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी खास संधी आहे. वनप्लसच्या कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट दिली जात आहे. सविस्तर जाणून घ्या….
वनप्लसचा हा स्मार्टफोन ६ हजारांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. वनप्लस ७ च्या ६ जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत लाँचिंगवेळी ३२ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता हा स्मार्टफोन २९ हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. तर ८ जीबी रॅम मॉडल केवळ ३४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. या शिवाय अॅमेझॉनवरून हा फोन खरेदी केल्यास युजर्संना एसबीआय कार्डवर १००० रुपयांचा इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्लस ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या फोनला MRP पेक्षा १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकले जात आहे. ८ जीबी रॅम असलेल्या या फोनची लाँचिंगवेळी किंमत होती. ५२ हजार ९९९ रुपये. पंरतु, आता हा फोन केवळ ४२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. फोनचा १२ जीबी रॅम मॉडलची किंमत आता ४८ हजार ९९९ रुपये झाली आहे. वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या अॅमेझॉनवर एसबीआय कार्डवरून पेमेंट केल्यास १२५० रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट दिले जात आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
वनप्लस ७ टी या स्मार्टफोनच्या खरेदीवर ३ हजारांची सूट दिली आहे. ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत लाँचिंगवेळी ३७ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता हा फोन ३४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. त्यानंतर १२ मेगापिक्सलचा प्लस १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनच्या खरेदीवर एसबीआय कार्डवर अॅमेझॉवर १ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी